पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहर प्रस्तावित विकास आराखड्यातील काही आरक्षणांमुळे जनसामान्यांच्या हितावर गदा येत असून, त्याविरोधात आज बारणे कॉर्नर ते थेरगाव दरम्यान ‘निवारा हक्क संवाद यात्रे’चे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते राहुल कलाटे म्हणाले की, नागरिकांच्या घरांवर बुलडोजर फिरवायला निघालेल्या प्रशासनाच्या निर्णयाला तीव्र विरोध आहे. शहराच्या विकासासाठी बनविण्यात आलेला डीपी सामान्य नागरिकांचा कोणताही विचार न करता तयार करण्यात आला आहे. रहाटणी, थेरगाव वाल्हेकरवाडी, चिंचवडे नगर, बिजलीनगर येथील हजारो घरे यामुळे बाधित होत असून, अनेक संसार उद्ध्वस्त होणार आहेत. त्यामुळे हा आराखडा नागरिकांवर लादला जाऊ नये आणि सामान्य नागरिकांना न्याय मिळाला पाहिजे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते राहुल कलाटे, स्वाभिमान घर बचाव संघर्ष चळवळीचे अध्यक्ष धनाजी येळकर, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवक अध्यक्ष इम्रान शेख, प्रमोद शिंदे, विशाल बारणे, हनुमान पिसाळ आदींसह स्थानिक नागरिक उपस्थित होते.






















Join Our Whatsapp Group