पिंपरी (Pclive7.com):- पिंपरीगाव येथील तपोवन मंदिर रोड परिसरात गांजाची बेकायदेशीर विक्री करताना एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई शनिवार (दि.२१) सकाळी अकरा वाजताच्या सुमारास करण्यात आली.
पोलीस शिपाई संतोष बिभषण सपकाळ यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. योहान अरुण आंब्रे (वय १९, रा. वाघेरे चाळ, पिंपरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आंब्रे याच्याकडून ९ हजार ७०० रुपयांचा १९४ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. आरोपी हा गांजाची विक्री करण्यासाठी त्या परिसरात थांबलेला होता. या प्रकरणी पिंपरी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.






















Join Our Whatsapp Group