पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेचे दिवंगत महापौर भिकू वाघेरे (पाटील) यांच्या ३२ व्या स्मृतिदिनानिमित्त पिंपरीगावात स्मृतीदिन साजरा करण्यात येणार आहे. या निमित्त प्रतिष्ठानच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा पिंपरी चिंचवड समाजभूषण पुरस्कार यंदा समाजसेवक वाल्मिकी कुटे यांना देण्यात येणार आहे, अशी माहिती भिकू वाघेरे प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी आज (सोमवारी) पत्रकार परिषदेत दिली.
प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष चंद्रकांत गव्हाणे, सचिव बाळासाहेब वाघेरे, सदस्य पंडित कापसे, पोपट महाराज इंगळे, विलास व-हाडे, स्वप्निल सुर्वे, हणमंत वाघेरे आदी या वेळी उपस्थित होते.
कै. भिकू वाघेरे (पाटील) यांच्या ३२ स्मृतिदिनानिमित्त बुधवारी (दि.६) सकाळी नऊ वाजता महापौर नितीन काळजे, आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या हस्ते कै. भिकू वाघेरे (पाटील) यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येईल.
खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, गौतम चाबुकस्वार, माजी आमदार विलास लांडे, महापौर नितीन काळजे, आयुक्त श्रावण हर्डीकर, स्थायी समिती अध्यक्षा ममता गायकवाड, विरोधी पक्षनेते दत्ता साने, माजी महापौर मंगला कदम, नगरसेवक नाना काटे, भाऊसाहेब भोईर, संदीप वाघेरे, माजी विरोधी पक्षनेते योगेश बहल, राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षा वैशाली काळभोर, युवक शहराध्यक्ष विशाल वाकडकर, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, उधोजक विजय काटे, पवना सहकारी बँकेचे माजी उपाध्यक्ष शिवाजी वाघेरे, माजी नगरसेवक हनुमंत नेवाळे, रंगनाथ कुदळे आदी या वेळी उपस्थित राहणार आहेत.
त्यानंतर साडेनऊ ते दुपारी एक वाजेपर्यंत नवहाराष्ट्र विद्यालयाच्या सभागृहात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १०.३० वाजता समाजसेवक वाल्मिकी कुटे यांना पिंपरी चिंचवड समाजभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे (पाटील) यांनी दिली आहे.






















Join Our Whatsapp Group