पिंपरी (Pclive7.com):- नेवाळे वस्ती येथील बर्ड्स इंटरनॅशनल स्कूलकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर एप्रिल २०२५ पासून स्ट्रॉम वॉटर लाईनचे काम सुरू आहे. परंतु, सदरचे काम तीन महिने होऊन ही अपूर्ण असल्याने परिसरातील रहिवाशांना आणि विशेषतः शाळकरी मुलांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याने हे काम तातडीने पूर्ण करा अशी मागणी फ क्षेत्राचे स्थापत्य कार्यकारी अभियंता यांच्याकडे भाजप युवा मोर्चा सरचिटणीस माजी स्वीकृत नगरसेवक दिनेश यादव यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

हे काम अपूर्ण असल्याने रस्त्याची संपूर्ण खोदाई तशीच आहे, याठिकाणी पावसामुळे पाणी साचत आहे. त्यामुळे अपघात होण्याचा धोका वाढला आहे. लहान मुलांना शाळेत जाताना जीव धोक्यात घालावा लागत असल्याने पालकांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे.
त्यामुळे याबाबत सदर कामाचे वेळापत्रक जाहीर करून लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे, ठेकेदारास कारणे दाखवा नोटीस दिली जावी, रस्त्यावर तात्पुरती सुरक्षित वाहतुकीची व्यवस्था करण्यात यावी, अपघात टाळण्यासाठी प्रकाश, चेतावणी फलक, बॅरिकेड्स लावण्यात यावेत, नागरिकांच्या आरोग्य व सुरक्षिततेच्या दृष्टीने ही बाब अत्यंत महत्त्वाची असून याबाबत तातडीने या कामाला गती देण्याचे संबंधित ठेकेदाराला आदेश द्या अशी मागणी यादव यांनी केली आहे.






















Join Our Whatsapp Group