पिंपरी (Pclive7.com):- काळेवाडी येथे सात जणांच्या टोळक्याने दहशत निर्माण करत दोघांवर खुनी हल्ला केला. ही घटना ८ जुलै रोजी दुपारी जीवन चौकात घडली.

ऋतुराज प्रमोद निकम (१९, काळेवाडी) यांनी काळेवाडी पोलीसात फिर्याद दिली आहे. अभिषेक श्यामराव निंबाळकर (२१), गोट्या पवार (३०), अनुज निनाजी कोरे (१९), आयुष सुनील खैरे (२०), हर्ष विनोद महाडिक (२०), सागर रमेश शिंदे (२५) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी निकम यांना जीवन चौक, काळेवाडी येथे बोलावून घेतले. निकम आणि त्यांचे दोन मित्र तिथे गेले असता आरोपींनी निकम आणि त्यांचा मित्र रोहन रहाटे यांना कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले. तसेच कोयते हवेत फिरवून आरोपींनी दहशत निर्माण केली. पोलिसांनी सात जणांना अटक केली आहे.






















Join Our Whatsapp Group