चिंचवड (Pclive7.com):- सोन्याचा लेप असलेली तांब्याची चेन गहाण ठेवून चिंचवड मधील सराफाची एक लाखाची फसवणूक करण्यात आली. ही घटना (दि.२७ जून) रोजी चिंचवड येथील दिलीप सोनिगरा ज्वेलर्स दुकानात घडली.

श्रीपाल सागरमल सोनिगरा (४५, चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार राकेश भवानजी पासद (नाने चौक, पुणे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने १६.३४० ग्रॅम वजनाची तांब्याची चेन सोन्याचा लेप लावून खरीचं सोन्याचे असल्याचे भासवून सोनिगरा ज्वेलर्स दुकानात गहाण ठेवली. दुकानातून एक लाख रुपये घेतले. त्यानंतर चेन बनावट असल्याचे उघडकीस आले. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

























Join Our Whatsapp Group