
पिंपरी (Pclive7.com):- सार्वजनिक ठिकाणी थुंकले, कचरा टाकणे नागरिकांना चांगलेच महागात पडले आहे. प्रभाग क्रमांक २७ रहाटणी परिसरात महापालिकेच्या ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयाच्या आरोग्य विभागाने मोठी कारवाई केली आहे. सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्या २२८ नागरिकांकडून पंधरा दिवसात तब्बल १ लाख २७ हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयाच्या आरोग्य विभागाच्या पथकाने गेल्या पंधरा दिवसात प्रभाग क्रमांक २७, रहाटणी-श्रीनगर मध्ये ही दंडात्मक कारवाई केली आहे. रहाटणी, श्रीनगर, तापकीर चौक, नखाते चौक, रहाटणी फाटा, काळेवाडी फाटा, तांबे रोड या परिसरात सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्या एकूण २२८ नागरिकांकडून १,२७,२०० रू. दंड वसुल करण्यात आला आहे.

दंड खालील प्रमाणे..
१) सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकलेबाबत एकूण २१७ नागरिकांकडून रक्कम रुपये- ९१,२००/- दंड
२) बंदी असलेले प्लास्टिक वापर केलेबाबत (पहिला प्रसंग) प्रत्येकी र रु – ५,०००/- प्रमाणे २ कारवाई र रु- १०,०००/- दंड
३) डासउत्पत्ती स्थानांची निर्मिती केलेबद्दल (सोसायटी,हॉटेल,मॉल्स) र रु – १०,०००/- दंड
४) मोकळ्या प्लॉटमध्ये कचरा टाकलेबाबत प्रत्येकी र रु – २,०००/- प्रमाणे ४ कारवाई र रू ८,०००/- दंड
५) सार्वजनिक ठिकाणी कचरा जाळलेबाबत र रू -५,०००/-
६) सार्वजनिक ठिकाणी थुंकलेबाबत प्रत्येकी र रु- १,०००/- प्रमाणे ३ कारवाई र रू- ३,०००/-दंड

सदरची कारवाई “ग” प्रभागाचे क्षेत्रिय अधिकारी किशोर ननवरे, सहा.आरोग्य अधिकारी कुंडलिक दरवडे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य निरीक्षक गणेश राजगे, आरोग्य मुकादम आबा कदम, अरुण राऊत, प्रदीप जगताप, किरण त्रिभुवन, गणेश कार्ले, विशाल यादव, धोंडीबा भालेराव, सागर जाधव, पांडुरंग साठे, अमरदीप जगताप, श्रीकांत कांबळे, संतोष शेरखाने, भारत गायकवाड आणि डिवाईन स्टाफ यश लोंढे या पथकाने केली आहे.





















Join Our Whatsapp Group