भोसरी (Pclive7.com):- भोसरी येथे देशी बनावटीचे पिस्तुल आणि एक जीवंत काडतुससह तरुणाला अटक करण्यात आली आहे. अविनाश महादेव जाधव (वय २८ रा. शिवसेना चौक, विठ्ठल नगर लांडेवाडी भोसरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. भोसरी पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार सचिन मोरे यांनी या संदर्भात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी अविनाश जाधव हा (दि.१०) रोजी दुपारी १.१५ च्या सुमारास भोसरी येथील बैलगाडा घाट, नवीन हॉस्पिटल शेजारी एक देशी बनावटीचे पिस्टल आणि एक जिवंत काडतुस असा सुमारे २१ हजार रुपये किंमतीचा विनापरवाना शस्त्रास्त्र जवळ बाळगले असताना आढळून आला.

याप्रकरणी भोसरी पोलिसांनी आरोपी अविनाश जाधव याला घातक शस्त्र बाळगल्याप्रकरणी ताब्यात घेतले असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्री. खाडे करीत आहेत.






















Join Our Whatsapp Group