पिंपरी (Pclive7.com):- दुचाकीवरून कामावर चाललेल्या तरुणास रस्त्यात थांबवून त्याच्यावर कोयत्याने डोक्यावर व कपाळावर वार करत गंभीर जखमी केले आहे. ही घटना रहाटणी येथे बुधवारी (दि.९) रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास एसएनबीपी स्कूल जवळ रहाटणी येथे घडली.

निवतन मगर (वय १८, रा.थेरगाव) आणि त्याच्या दोन साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुषार राजू पुलावळे (वय २१, थेरगाव) असे हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून त्यांनी गुरुवारी (दि.१०) काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तुषार हे दुकानात कामावर जात असताना रहाटणी येथे आरोपींनी त्यांना थांबवून शिवीगाळ केली. त्यानंतर कोयत्याने डोक्यावर व कपाळावर वार करीत गंभीर जखमी केले. आरोपींच्या साथीदारांनी लाथाबुक्यांनी मारहाण केली. काळेवाडी पोलीस तपास करीत आहेत.






















Join Our Whatsapp Group