पिंपरी (Pclive7.com):- पोलीस फ्रेन्डस् वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने चिंचवड पोलीस स्टेशन आणि पिंपरी पोलीस स्टेशन येथे रक्षाबंधनाचा सण उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी असोसिएशनच्या महिला पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना राखी बांधून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

सर्वसामान्य नागरिकांचे सण-उत्सव आनंदी आणि सुरक्षित वातावरणात पार पडावेत यासाठी पोलीस अधिकारी व कर्मचारी दिवस-रात्र कर्तव्य बजावत असतात. त्यामुळे त्यांनाही सणाचा आनंद अनुभवता यावा या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती पोलीस फ्रेन्डस् वेल्फेअर असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष गजाननभाऊ चिंचवडे यांनी दिली.

या कार्यक्रमास चिंचवड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चासकर, पिंपरी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक रूपाली बोबडे, असोसिएशनचे सचिव शुभम चिंचवडे, पुणे जिल्हाध्यक्ष सचिन लाड, पुणे जिल्हा युवक अध्यक्ष कमलजित सिंग, रणजित वडणे, उदय वाडेकर, निर्मला माने, अर्चना पाटील, जान्हवी हजारे, तृप्ती चैतन्य, शीतल दुर्वे, शैला काळे, अंजली स्वामी यांच्यासह दोन्ही पोलीस ठाण्यांतील अधिकारी, कर्मचारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राखी बांधण्याच्या या उपक्रमामुळे पोलीस आणि नागरिकांमधील स्नेहबंध अधिक दृढ होत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि भावनिक वातावरणात पार पडला.






















Join Our Whatsapp Group