पिंपरी (Pclive7.com):- शिव महापुराण ही जीवांचे कल्याण करणारी कथा आहे. श्रवण भक्ती सर्वश्रेष्ठ आहे. भक्ती नेहमी श्रद्धेने, निष्ठेने, भावाने करावी. भक्तीचे श्रवण, कीर्तन, स्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सक्य आणि आत्म निवेदन असे नऊ प्रकार आहेत हे समजून घेण्यासाठी शिवपुराण कथेचे श्रवण करावे असे हभप अमर महाराज एकडे (आळंदी) यांनी सांगितले.

ज्येष्ठ माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवतेज नगर चिंचवड येथील घरकुल चौकाजवळ श्री स्वामी समर्थ मंदिर येथे श्रावण मास निमित्त हभप अमर महाराज एकडे यांच्या शिवपुराण कथा वाचनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यांना ज्येष्ठ नागरिक श्रीमंत पवार काका (टाळ), महेश गव्हाणे (तबला) आणि वैभव महाराज (हार्मोनियम) यांनी साथ दिली. या कार्यक्रमाच्या आयोजनात सारिका रिकामे, स्नेहा गुणवंत, क्षमा काळे, गीता पाटील, विद्या दुदुसकर, नीलिमा भंगाळे, स्मिता शिरसाट, मंगल काळे, छाया महाजन, अश्विनी केवाडकर आणि हरिनारायण शेळके काका, राजीव गुणवंत, दीपक बिरादार, चैतन्य बनकर, मेघराज बागी, रोहन नंदनवाड यांनी आयोजनात सहभाग घेतला होता.

“मंगलम भगवान विष्णू, मंगलम गरुड ध्वज, मंगलम पुंडरी काक्षो, मंगलाय तनु हर” या मंत्राने हभप अमर महाराज एकडे शिवपुराण कथा वाचनाचा समारोप केला. यावेळी बालगोपाळांनी शिव पुराण कथेतील “शिवपार्वती विवाह” आणि इतर प्रसंग सादर केले.
शिवतेज नगर चिंचवड येथील श्री स्वामी समर्थ मंदिर येथे वर्षभर विविध पारंपरिक व धार्मिक सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. त्याचा हजारो भक्त, भाविक लाभ घेतात अशी माहिती नारायण बहिरवाडे यांनी दिली.





















Join Our Whatsapp Group