पिंपरी (Pclive7.com):-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष, माजी महापौर योगेश बहल यांच्या वाढदिवसानिमित्ताने उद्या रविवार (दि.१३) रोजी महेशनगर चौक, एच ए ग्राउंड समोर संत तुकाराम नगर येथे हॅप्पी स्ट्रीटचे आयोजन करण्यात आलेले आहे.

या कार्यक्रमासाठी हजर असणाऱ्या प्रत्येकाला टी-शर्ट आणि अल्पोपहार देण्यात येणार आहे. तसेच लहान मुला – मुलींसाठी मनोरंजनाचे कार्टून कॅरेक्टर ठेवण्यात आलेले आहे. तरी प्रभागातील सर्व पुरुष महिला, तरुण- तरुणींनी, नागरिकांनी उद्या रविवार दि.१३ रोजी सकाळी ०७ वाजता उपस्थित रहावे असे आवाहन योगेश बहल मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.























Join Our Whatsapp Group