मुंबई (Pclive7.com):- मोठी बातमी समोर येत आहे, काल भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यामध्ये जोरदार राडा झाला होता. दोन्ही नेत्यांनी एकमेकांना शिवीगाळ देखील केली होती.

हे प्रकरण ताजं असतानाच आता पडळकर आणि आव्हाड समर्थकांमध्ये जोरदार राडा झाला आहे. विधानभवनाच्या लॉबीमध्येच दोन्ही नेत्यांचे समर्थक भिडले, यावेळी हाणामारी देखील झाल्याचं पाहायला मिळालं.

बुधवारी विधानभवनाच्या बाहेर गेटवर गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात जोरदार वाद झाला होता. वाद इतक्या टोकाला गेला होता की, गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांनी एकमेकांना शिवीगाळ केली. पडळकरांच्या गाडीचा दरवाजा लागल्याचा आरोप आव्हाडांनी केला होता.























Join Our Whatsapp Group