पिंपरी (Pclive7.com):- संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पिंपरीगावाने जय्यत तयारी केली असून, संपूर्ण गाव भक्तिमय वातावरणात न्हालं आहे. पालखीचे स्वागत थाटामाटात करण्यासाठी नगरसेवक संदीप वाघेरे आणि ग्रामस्थांनी कंबर कसली आहे.

याविषयी अधिक माहिती देताना संदीप वाघेरे म्हणाले कि, सालाबाद प्रमाणे याही वर्षी शनिवार दिनांक १९ जुलै २०२५ रोजी जगद्गृरू संत तुकाराम महाराज पालखीचे आगमन पिंपरी गावातील ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ मंदिर येथे होणार आहे. यानिमित्ताने पालखी आगमन सोहळ्यासाठी तयारीचा आढावा घेण्यात आला असून, स्वच्छता, रस्त्यांची दुरुस्ती, पाणीपुरवठा, आरोग्य व्यवस्था, वाहतूक नियंत्रण आणि पालखी मार्गावरील रोषणाई व सजावट आदी महत्त्वाच्या बाबींवर त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांसोबत प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली आहे.

संदीप वाघेरे म्हणाले, “संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा हे पिंपरी गावासाठी आध्यात्मिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे पर्व आहे. ग्रामस्थांच्या सहकार्याने आणि प्रशासनाच्या समन्वयातून या वर्षीचा पालखी सोहळा अधिक भव्य आणि सुस्थितीत पार पाडण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”
या प्रसंगी गावातील जोग महाराज प्रासादिक दिंडीचे संदेश गोलांडे, विजय जाचक, हरिभाऊ कुदळे, राजेंद्र वाघेरे, हनुमंत वाघेरे, अभिजित शिंदे, शेखर अहिरराव, भगवान भालेराव तसेच स्वयंसेवी संस्था, महापालिका अधिकारी चंद्रकांत गुंडाळ, जयवंत रोकडे, शेळके साहेब, बापूसाहेब रोकडे, व स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते.

पालखी आगमनाच्या दिवशी भाविकांसाठी संदीप वाघेरे व ग्रामस्थांच्या वतीने महाप्रसादाची व्यवस्था तसेच वैद्यकीय सुविधा, मदत केंद्रे आणि विश्रांती शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. संपूर्ण परिसरात सीसीटीव्हीच्या माध्यमातून सुरक्षा व्यवस्थाही उभी करण्यात येत आहे. पिंपरी गाव आता संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे स्वागत करण्यासाठी सज्ज असून, भक्तांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे असे संदीप वाघेरे म्हणाले.
Tags: Sandeep Waghere

























Join Our Whatsapp Group