भीमाशंकर (Pclive7.com):- श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी श्री क्षेत्र भीमाशंकर येथे भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या या पवित्र स्थळी पहाटे मुख्य शिवलिंगावर दुग्धाभिषेक करून महाआरती आणि शंखनाद करण्यात आला.

बारा ज्योतिर्लिंगांपैकी पुणे जिल्ह्यातील सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर येथे आज पहिल्या श्रावणी सोमवार निमित्त राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक भक्तांनी श्री भीमाशंकरच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे.

मंदिराला आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आली असून भीमाशंकर हे भारतातील १२ जोर्तिंलींगापैकी सहावे जोर्तिंलिंग आहे. आज पहाटेची आरती झाल्यानंतर दर्शन भाविकांसाठी खुले करण्यात आले तर मध्य रात्री पासून भाविकांनी मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी गर्दी केली आहे.






















Join Our Whatsapp Group