पिंपरी (Pclive7.com):- डिव्हायडर शेजारी दोन वाहने पार्क करून रस्त्यावर येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांना आणि वाहनांना अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी (दि.२६) दुपारी पिंपरी येथील भोला हॉटेलसमोरील के.एस.बी. चौक ते थरमॅक्स चौक या रोडवर ही कारवाई करण्यात आली.

या प्रकरणी पोलिस शिपाई अमोल बडक यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, सौरभ रविंद्र भावसार (रा. श्रीरामपूर, अहमदनगर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसा र, आरोपीने त्याच्या ताब्यातील दोन वाहने भोला हॉटेलसमोरील के. एस. बी. चौक ते थरमॅक्स चौक या रोडवर डिव्हायडर शेजारी पार्क करून रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना व वाहनांना अडथळा निर्माण केला. वाहने रस्त्यावरून काढण्याबाबत पोलिस शिपाई अमोल बडक यांनी सांगितले असता, त्याने पोलिसांशी अरेरावीची भाषा वापरून मी गाड्या काढत नाही, तुम्हांला काय करायचे आहे ते करून घ्या, तुम्हाला काय अधिकार आहे गाड्या काढण्याचा, असे बोलून शिवीगाळ करून पळून गेला. पिंपरी पोलिस तपास करत आहेत.






















Join Our Whatsapp Group