चाकण (Pclive7.com):- लग्नास नकार दिल्याने मित्राने महिलेला इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून खाली फेकून देत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. ही घटना शुक्रवारी (दि.२५) रात्री १० वाजण्याच्या सुमारास चाकण येथील नाणेकरवाडी येथे घडली.

या प्रकरणी जखमी महिलेने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुरेशसिंग शिवकुमार (मनिंदरगड, कोरिया, छत्तीसगड) याला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेने मित्र आरोपी शिवकुमार याला लग्नाला नकार दिला होता. त्या कारणावरून त्याने फिर्यादीच्या घरी येऊन ‘तू माझ्याशी लग्न करत नाहीयेस! आत्ताच तुला जीवे मारतो’ असे बोलून, फिर्यादीला मारहाण केली. त्यानंतर त्यांना उचलून दुसऱ्या मजल्याच्या पॅसेजवरून जीवे मारण्याच्या उद्देशाने खाली फेकून दिले. त्यामुळे फिर्यादीच्या डाव्या मांडीचे हाड, बरगडी आणि पाठीचा मणका फॅक्चर होऊन गंभीर दुखापत झाली. याप्रकरणी पुढील तपास चाकण पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक संदीप बोरकर करत आहेत.






















Join Our Whatsapp Group