पिंपरी (Pclive7.com):- हद्दपारीचा आदेश मोडून सार्वजनिक ठिकाणी कोयता बाळगल्याप्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली. ही कारवाई शनिवारी (२६ जुलै) सायंकाळी निगडी येथील आयटीआय कॉलेजजवळ करण्यात आली.

आदित्य उर्फ भाव्या किशोर बावीस्कर (२३, ओटास्किम, निगडी) याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अजित सानप यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आदित्य याला पिंपरी चिंचवड पोलिसांनी २१ सप्टेंबर २०२३ रोजी दोन वर्षांसाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार केले आहे. त्याने कुठलीही परवानगी न घेता तो शहरात आला. त्याने स्वतःकडे कोयता हे शस्त्र बाळगले. याबाबत माहिती मिळाली असता पोलिसांनी कारवाई करत त्याला अटक केली. निगडी पोलीस तपास करत आहेत.






















Join Our Whatsapp Group