पिंपरी (Pclive7.com):- शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त गोरगरीब रस्त्यावर आपल जीवन जगत असणाऱ्या गरीबांना त्यांच्या आहे त्या जागेवर जाऊन डॉ बाबासाहेब आंबेडकर पिंपरी चौक ते निगडी शक्तभक्ती चौक येथे ब्लेंकेट वाटप पिंपरी विधानसभा समन्वयक गणेश आहेर यांच्या वतीने करण्यात आले.

यावेळी उपस्थितांच्या शुभहस्ते गरजूंना ब्लॅंकेट वाटप करण्यात आले. याप्रसंगी शिवसेना महिला जिल्हा संघटिका अनिताताई तुतारे, महिला जिल्हा समन्वयक सुशिलाताई पवार, महिला शहर संघटिका रुपालीताई आल्हाट, तस्लिम शेख, पूनम रेठे, चिंचवड विधानसभा प्रमुख हरेश आबा नखाते, गोरख पाटील, गणेश पाडूळे, हनुमंत पिसाळ, नरसिंग माने, अंकुश पवार, दिपक भक्त, दत्ता गिरी, गणेश वायभट तसेच मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.























Join Our Whatsapp Group