पिंपरी (Pclive7.com):- एमआयडीसी भोसरी मधील ब्राईट इंडिया टूल्स या दुकानातून ४० लाख ५० हजारांचे साहित्य चोरून नेणाऱ्या मुंबईतील टोळीला एमआयडीसी भोसरी आणि गुन्हे शाखा युनिट पाचने अटक केली. त्यांच्याकडून ४० लाख ५० हजार रुपये किमतीचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. मुंबईतून एमआयडीसी भोसरी परिसरात येऊन ही चोरी केली होती.
हुसेनअली शौकतअली सय्यद (४५, नाशिक. मूळ रा. उत्तर प्रदेश), सोहेल फकरुद्दीन कुरेशी (२५, गिरगाव मुंबई. मूळ रा. उत्तर प्रदेश), असिफ युसूफ खान (३९, सायन मुंबई), अजमत अजगर अली (४३, भेंडी बाजार, मुंबई. मूळ रा. उत्तर प्रदेश) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलीस उपायुक्त बापू बांगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, बालाजी गौरीशंकर हलकुडे यांचे एमआयडीसी भोसरी मध्ये ब्राईट इंडिया टूल्स नावाचे दुकान आहे. ११ जुलै रोजी त्यांच्या दुकानातून ४० लाख ५० हजार रुपये किमतीचे कार्बाईड टूल्स आणि कार्बाईड इन्सर्ट मटेरियल चोरीला गेले. याबाबत एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. एमआयडीसी भोसरी पोलीस आणि गुन्हे शाखेच्या युनिट पाचने तांत्रिक विश्लेषण आणि सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करत आरोपींची ओळख पटवली. त्यानंतर आरोपींचा मुंबई आणि उत्तर प्रदेश शोध घेऊन चौघांना अटक केली. आरोपींनी चोरी केलेले सर्व साहित्य मुंबई येथे ठेवले होते. सर्व साहित्य जप्त करण्यात आले आहे.

सदरची कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, पोलीस सह आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अप्पर पोलीस आयुक्त सारंग आवाड, पोलीस उप आयुक्त परि.३ बापु बांगर, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) डॉ. शिवाजी पवार, सहा. पोलीस आयुक्त एम.आय.डी.सी भोसरी विभाग अनिल कोळी, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) विशाल हिरे, एम.आय.डी.सी भोसरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जामदार, गुन्हे शाखा युनिट ५ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष कसबे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट ५ कडील सहायक पोलिस निरीक्षक श्रीधर भोसले, एम.आय.डी.सी भोसरी पोलीस स्टेशन कडील पोलीस उप निरीक्षक राजेंद्र पानसरे, पोलीस उप निरीक्षक मन्सुर मणेर, पोलीस अंमलदार चंद्रकांत गवारी, प्रशांत सोरटे, गणेश बोऱ्हाडे, नितीन खेसे, भागपत शेप, आनंद जाधव, अक्षय क्षिरसागर, उमेश सातकर, गजानन आढे, रविंद्र जाधव युनिट ५ कडील पोलीस अंमलदार प्रशांत पवार, शामसुंदर गुट्टे, ज्ञानेश्वर गाडेकर, राजकुमार ईघारे, तां.वि. शाखेकडील नागेश माळी, राजु जाधव, प्रकाश ननावरे, पोपट हुलगे, रमेश कारके यांनी केली आहे.






















Join Our Whatsapp Group