थेरगावच्या विशाल मित्र मंडळाचा प्रथम क्रमांक, मोशीतील श्री शिवशंभो प्रतिष्ठान द्वितीय तर फुगेवाडी येथील आझाद हिंद मंडळाचा तृतीय क्रमांक
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वतीने सार्वजनिक गणेशोत्सव २०२४ चा श्री मोरया पुरस्कार प्रधान सोहळा आज (दि.०६) मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या पुरस्कार सोहळ्यामध्ये पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीतील सर्व सहभागी गणेश मंडळांमधून निकषाच्या आधारे पोलीस आयुक्त स्तरावर तीन मंडळांना पुरस्कार देण्यात आला. यात थेरगाव येथील विशाल मित्र मंडळाने प्रथम क्रमांक पटकावला. बारणे वस्ती मोशी येथील श्री शिवशंभो प्रतिष्ठानला द्वितीय तर फुगेवाडी येथील आझाद हिंद मंडळाला तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.

परिमंडळ १ स्तरावरील पारितोषिक
सेक्टर नंबर २६ निगडी येथील शरयू प्रतिष्ठान प्राधिकरण या मंडळाचा प्रथम क्रमांक आला. चिंचवड येथील एस.के.एफ गणेशोत्सव मंडळाचा द्वितीय तर जुनी सांगवी येथील मधुबन मित्र मंडळाने तृतीय क्रमांक पटकाविला.

परिमंडळ २ स्तरावरील पारितोषिक
पाटील नगर बावधन येथील सिद्धीचा गणपती महिला मंडळाने पहिला क्रमांक पटकाविला. दांगट वस्ती विकास नगर देहूरोड येथील श्री शिवछत्रपती तरुण मंडळाचा द्वितीय तर रहाटणी कोकणे चौक येथील कोकणे चौक मित्र मंडळाचा तृतीय क्रमांक आला आहे.

परिमंडळ ३ स्तरावरील पारितोषिक
मार्केट यार्ड चाकण येथील मयूर मित्र मंडळाचा प्रथम क्रमांक, चाकण गोल्डन चौक येथील नवयुग मित्र मंडळाचा द्वितीय तर रुपीनगर चिखली येथील दक्षता तरुण मंडळाने तृतीय क्रमांक पटकाविला आहे.
या सर्व विजेत्या मंडळांना पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे तसेच महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.






















Join Our Whatsapp Group