चिंचवड (Pclive7.com):- चिंचवड मधील रिव्हरह्यू हॉटेलमध्ये बांगलादेशातून भारतात बेकायदेशीर प्रवेश करून राहणाऱ्या दोन संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे. १५ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास चिंचवडगाव येथील थेरगाव विसर्जन घाटाजवळ ही कारवाई करण्यात आली.

सुनांदो कुमार निताबचंद दास (३५, मुळ रा. हसमदिया, भांगा नगरपालिका, जि. फरिदपुर, बांग्लादेश) आणि अमित विश्वजित मंडल (२५, मुळ रा. तेघरीहुडा, उपजि. कालीगंज, जि. झेनाईदाह, बांगलादेश) अशी आरोपींची नावे आहेत. पोलिस हवालदार संतोष डोंगरु उभे यांनी या प्रकरणी चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी २०१९ व २०२४ पासून भारतात बेकायदेशीररित्या राहात होते. विशेष म्हणजे आरोपी अमित विश्वजित मंडल याने बनावट आधारकार्ड, पॅनकार्ड, मतदार ओळखपत्र तयार करून स्वतःला भारतीय दाखवले होते. हे कागदपत्रे पोलिसांनी जप्त केली आहेत.























Join Our Whatsapp Group