भिमाशंकर (Pclive7.com):- श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारच्या पवित्र पर्वानिमित्त बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भिमाशंकराची महादेव नगरी शिवभक्तीने अक्षरशः दुमदुमून गेली आहे.

श्रावण महिन्यातील आज शेवटचा सोमवार असल्यामुळे श्रीक्षेत्र भिमाशंकरला दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासूनच मोठी गर्दी केली होती. ‘हर हर महादेव… ओम नम: शिवाय’च्या अखंड जयघोषाने वातावरण दुमदुमलं असून हजारो भाविकांनी दर्शनासाठी लांबच लांब रांगा लावल्या आहेत.

पहाटे पाच वाजता भिमाशंकराच्या पवित्र मुख्य शिवलिंगावर दुग्धाभिषेक, महाआरती आणि शंखनाद करण्यात आला. भिमाशंकराच्या महादेव नगरीत शिव भक्तीने भाविक तल्लीन झाला आहे. दरम्यान शेवटच्या श्रावणी सोमवारनिमित्ताने भिमाशंकर मंदिराचा गाभारा व सभामंडप यांची विविधरंगी फुलमाळांनी आकर्षक सजावट करण्यात आली असून दिवसभर दर्शनासाठी आलेल्या भाविकांमुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाल्याचे पहायला मिळत आहे.























Join Our Whatsapp Group