पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महानगरपालिका, जिल्हा क्रीडा परिषद पुणे व एच ए स्कूल यांचे सहकार्याने आयोजित जिल्हास्तरीय शालेय रग्बी स्पर्धा सन २०२५ च्या स्पर्धेचे उद्घाटन शनिवार (दि.१६) रोजी सकाळी १० वाजता क्रीडा अधिकारी रंगराव कारंडे यांचे हस्ते झाले.

सदर प्रसंगी एच ए स्कूल पिंपरी मुख्याध्यापिका दर्शना कोरके, क्रीडा पर्यवेक्षक समन्वयक दीपक कन्हेरे, मुकेश पवार क्रीडाशिक्षक एच ए स्कूल, चंद्रशेखर कुदळे, रामेश्वर हराळे, माजी क्रीडा अधिकारी रज्जाक पानसरे आदी मान्यवर उपस्थित होते.

या स्पर्धेचे प्रास्ताविक बन्सी आटवे यांनी केले. स्पर्धा सूत्रसंचालन सुभाष जावीर यांनी केले. सुरेश मंजाळ, गणेश भोसले, हरिभाऊ गायकवाड, विठ्ठल पारखे, रोनित आव्हाड, धनंजय झिंजुर्डे, खेराज ठक्कुरानी यांनी स्पर्धेचे परीक्षक म्हणून काम पाहिले. वय वर्षे १४, १७, १९ मुलांच्या स्पर्धा एच ए स्कूल पिंपरी येथे संपन्न झाल्या. पंचप्रमुख म्हणून मुसादिक चौधरी आणि त्यांच्या सहकारी पंचांनी काम पाहिले.अजिंक्य जांभळे, रियांश शेख, अवेज शेख, अविनाश राठोड, देवेंद्र चव्हाण या स्पर्धेचे या पंचांनी काम पाहिले.

जिल्हास्तर शालेय रग्बी स्पर्धा २०२५ अंतिम निकाल खालील प्रमाणे.
१४ वर्ष मुले- प्रथम क्रमांक कै. दत्तोबा काळे इ. मि स्कूल थेरगाव. वि.वि ज्ञानडीप विद्यालय रूपीनगर (०५१९)
५-०
तृतीय क्रमांक ३)ज्ञानडीप विद्यालय रूपीनगर (०५१९) वि.वि ज्ञानडीप विद्यालय रूपीनगर (२११३)
५-०
१७ वर्षे मुले- प्रथम क्रमांक एच. ए. स्कूल पिंपरी वि.वि डॉ. डि. वाय पाटील पब्लिक स्कूल पिंपरी
२५-०५
तृतीय क्रमांक ञानडीप विद्यालय रूपीनगर (२११३) हा संघ पात्र ठरला.
१९ वर्षे मुले
प्रथम क्रमांक १) सी. एम.एस. स्कूल निगडी वि.वि राजमाता जिजाऊ ज्यु कॉलेज लांडेवाडी भोसरी
१५-१०
तृतीय ३) एच.ए. स्कूल पिंपरी वि.वि एम.एम विद्यामंदिर मा. वि व उच्च मा.वि काळेवाडी.
१०-०५























Join Our Whatsapp Group