पिंपरी (Pclive7.com):- पवना धरण ९९.७० टक्के एवढे भरलेले असून आज (दि.१९) सकाळी १० वाजल्यापासून नदीपात्रात एकूण ४३०० क्युसेक्सने विसर्ग सुरू करण्यात आला आहे. यामध्ये जलविद्युत केंद्राद्वारे १४०० क्युसेक्स व सांडव्याद्वारे २९०० क्युसेक्स पाणी सोडले जात आहे.

पवना धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सतत पाऊस बरसत असल्याने आज (दि.१९) सकाळी १० वाजता धरणातून होणारा विसर्ग वाढवून ४३०० क्युसेक्स करण्यात आला आहे.

धरणातून होणारा विसर्ग पावसाच्या तीव्रतेनुसार टप्प्याटप्प्याने कमी-जास्त केला जाईल, असे जलसंपदा विभागाने स्पष्ट केले आहे. पवना नदीकाठच्या सर्व नागरिकांना योग्य ती खबरदारी घेण्याचे, तसेच प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.























Join Our Whatsapp Group