पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवडकरांची तहान भागविणारे पवना धरण १०० टक्के भरले आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवडवासीयांची वर्षभराच्या पाण्याची चिंता मिटलेली आहे. याच पवना धरणातून आता पवना नदीत ४३०० क्यूसेक्स वेगाने विसर्ग सुरु करण्यात आला आहे. परिणामी थेरगाव येथील पवना नदीवरील केजुबाई बंधारा ओसंडून वाहू लागला आहे.

संततधार सुरू असलेल्या पावसामुळे पवना नदीच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे थेरगाव येथील केजुबाई बंधारा ओसंडून वाहू लागला आहे. केजुबाई मंदिराला ही पाण्याने स्पर्श केला आहे. हे विलोभनीय दृश्य पाहण्यासाठी नागरिक या ठिकाणी गर्दी करू लागले आहेत.

केजुबाई बंधारा येथील याचं पाण्यात पाणकोंबड्या, बदके आनंद घेत आहेत, माशांची शिकार करुन, स्वतःची भूक भागवत आहेत. सोबतचं मावळ तालुक्यातील इंद्रायणी भात उत्पादक शेतकरी ही सुखावलेला आहे.























Join Our Whatsapp Group