पिंपरी (Pclive7.com):- मुंबई-बेंगलोर महामार्गावर पुनावळे येथे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला मागच्या बाजूने भरधाव वेगात आलेल्या दुचाकीने धडक दिली. यामध्ये दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला. ही घटना आज (मंगळवार) पहाटे घडली.
अभिषेक मनोज माने (वय १९) आणि अल्ताफ शेख (वय २८, दोघेही रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) अशी अपघातात मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिषेक आणि अल्ताफ आज पहाटे दुचाकीवरून मुंबई-बेंगलोर महामार्गावरून जात होते. पुनावळे येथे रस्त्याच्या बाजूला एक ट्रक उभा होता. त्या ट्रकचा दुचाकीवरील चालकाला अंदाज आला नाही. त्यामुळे अभिषेक आणि अल्ताफ यांची दुचाकी ट्रकला मागून जोरात धडकली. यामध्ये दोघांना गंभीर दुखापत झाली. त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.






















Join Our Whatsapp Group