पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी ते निगडी मेट्रो मार्गिकेकरिता सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. याबाबतचे पत्र महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन यांनी मनसेचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सचिन चिखले यांना दिले आहे. दरम्यान, पहिल्या टप्प्यातच हे काम पूर्ण करावे अशी आमची मागणी कायम राहणार असल्याचे चिखले यांनी स्पष्ट केले आहे.
पुणे ते पिंपरी दरम्यान मेट्रो मार्गाचे काम वेगात सुरु आहे. मात्र हा मार्ग निगडी भक्ती-शक्ती चौकापर्यंत नेण्यात यावा अशी मागणी विविध सामाजिक संस्थांनी आणि राजकीय नेत्यांनी केली होती. याबाबतचे निवेदन मनसेचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी महाराष्ट्र रेल कॉर्पोरेशन लि. यांना पाठवले होते.
या पत्राला उत्तर देताना महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेने केलेल्या विनंतीनुसार पिंपरी ते निगडी मेट्रो मार्गिकेकरिता सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम सुरु करण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र या मार्गाचे काम पहिल्या टप्प्यातच पूर्ण करावे अशी आग्रही मागणी सचिन चिखले यांनी केली आहे.





















Join Our Whatsapp Group