पिंपरी (Pclive7.com):- गेल्या दोन दिवसापासून पावसाने चांगलाच जोर धरला आहे. गेल्या २४ तासांत लोणावळा परिसरात तब्बल ४३२ मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे. सतत सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे थेरगाव येथील केजूबाई बंधारा, पुनावळे येथील बंधारे ओसंडून वाहत आहेत. पवना नदी पात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याची वाढ झाली असून चिंचवड गावातील मोरया गोसावी मंदिरात पाण्यात गेले आहे.


थेरगाव येथील केजूबाई बंधारा तुडूंब भरून वाहू लागला आहे. तसेच पुनावळे येथील बंधाराही ओसांडून वाहत आहे. त्यामुळे चिंचवड गावातील मोरया गोसावी मंदीर पाण्यात गेले आहे. कालपासून संततधार सुरू असल्यामुळे पाणी शिरले असून परिसरातील नागरिक हे पाणी पाहण्यासाठी गर्दी करू लागले आहेत.























Join Our Whatsapp Group