



पुणे जिल्ह्याच्या वेल्हे तालुक्यामध्ये राजगड, तोरणासारखे मोठे ऐतिहासिक किल्ले आहेत. वेल्हे तालुक्यातल्या ज्या राजगड किल्ल्यावरुन छत्रपती शिवाजी महाराजांनी 27 वर्षे स्वराज्याचा कारभार केला, त्या ऐतिहासिक राजगड किल्ल्याचे, स्वराज्याच्या पहिल्या राजधानीचे नाव वेल्हे तालुक्याला देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता. मागील अनेक वर्षांपासून वेल्हे तालुका आणि पुणे जिल्हावासियांची ही मागणी होती. आता ही मागणी खऱ्या अर्थाने पूर्ण झाली आहे.

वेल्हे तालुक्याचे नाव ‘राजगड’ करण्यासाठी तालुक्यातील 70 पैकी 58 ग्रामपंचायतींचे सकारात्मक ठराव घेण्यात आले होते. पुणे जिल्हा परिषदेच्या 22 नोव्हेंबर 2021 च्या सर्वसाधारण सभेत ‘राजगड’ नावाची शिफारस मंजूर करण्यात आली होती. पुणे विभागीय आयुक्तांकडून 5 मे 2022 ला तसा प्रस्ताव सादर करुन घेण्यात आला होता. त्यानंतर आता अखेर वेल्हे तालुक्याचे नाव ‘राजगड’ करण्यासाठी मंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णय झाला होता. त्यानंतर आता राजगड नावाला केंद्र सरकारची मान्यता देखील मिळाली आहे. महाराष्ट्र सरकारचे राजपत्र जारी होणार आहे.























Join Our Whatsapp Group