

पिंपरी (Pclive7.com):- वडापाव व्यवसायातील ट्रेडमार्क नावाची हुबेहुब नक्कल करून दोन आरोपींनी फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना मार्च २०२४ ते २२ ऑगस्ट २०२५ या कालावधीत डिलक्स चौक, पिंपरी येथे घडली.

अखिल निजामुद्दीन अन्सारी (वय ३६) आणि सलीम निजामुद्दीन अन्सारी (वय ४५, दोघे रा. मल्हारगड, मोशी, प्राधिकरण) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. अमर सोमेश्वर लाड (३९, रा. बनकरवस्ती, मोशी, पुणे) यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादींच्या श्री सिद्धिविनायक वडापाव या नोंदणीकृत ट्रेडमार्क नावाची SST श्री सिद्धिविनायक वडापाव अशी हुबेहूब नक्कल करून आरोपींनी आपला हॉटेल व्यवसाय सुरू केला. आरोपींनी हा व्यवसाय फिर्यादींच्या ग्राहकांना फसवून स्वतःचा आर्थिक फायदा करून घेण्यासाठी चालवला, असे फिर्यादीत नमूद आहे. पिंपरी पोलिस तपास करत आहेत.























Join Our Whatsapp Group