

पिंपरी (Pclive7.com):- काळेवाडी सोसायटी फेडरेशनच्या वतीने आज विजयनगर येथील खेळाच्या मैदानावर वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी फेडरेशनच्या माध्यमातून अनेक देशी वृक्षांचे रोपण करण्यात आले.

या कार्यक्रमाला विजयनगर परिसरातील सर्व सोसायटींचे चेअरमन, सेक्रेटरी, सभासद आणि नगरपालिकेचे उद्यान विभागाचे अधिकारी उपस्थित होते. त्याचबरोबर माजी नगरसेविका विजया सुतार, युवानेते सचिन काळे, कोमल काळे, विजय सुतार, मल्लेश कद्रापुरकर, शिवसेना नेते सुधाकर नलवडे, संतोष कदम, प्रकाश लोहार, भरत ठाकूर, प्रदीप शिंदे, संदीप शिंदे, राहुल रोकडे, ओम क्षीरसागर, देवेंद्र जाधव यांसह राजकीय, सामाजिक क्षेत्रातील अनेकांनी हजेरी लावली.

सध्या सिमेंटच्या वाढत्या जंगलामुळे नैसर्गिक वायू देणाऱ्या वृक्षांची संख्या कमी होत आहे. विकासकांमांसाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करून निसर्गाची हानी होत आहे. त्यामुळे वृक्षारोपणसारख्या उपक्रमांमुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होते. वृक्ष ऑक्सिजन पुरवठा, हवामान नियंत्रण, मातीची घूप रोखणे आणि जैवविविधता जपण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. तसेच, वृक्षारोपणामुळे स्थानिक समुदायाला स्वच्छ हवा, सावली आणि निसर्गाशी जोडले जाण्याची संधी मिळते असे मत उपस्थित मान्यवरांनी यावेळी व्यक्त केले.

या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी पर्यावरण रक्षणासाठी नियमित वृक्षारोपण आणि त्यांची जोपासना करण्याचा संकल्प केला. काळेवाडी सोसायटी फेडरेशनने या उपक्रमाद्वारे सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरण संरक्षणाचा आदर्श निर्माण केला आहे.
