
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट ४ च्या पथकाने सराईत गुन्हेगार बाबा गॅंग सक्रिय सदस्य असलेल्या पवन देवेंद्र बनेटी (वय-२४ वर्षे, रा- राजीव गांधी झोपडपट्टी, पिंपळे गुरव, सांगवी, पुणे) याला मोठ्या शिताफीने ताब्यात घेतलं आहे. त्याच्या ताब्यातून दोन पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे ही पोलिसांनी जप्त केली आहेत.

पवन बनेटी हा मोक्का जेल रिलीज व रेकॉर्डवरील आरोपी असून त्याच्याविरुद्ध दोन गंभीर स्वरूपाचे गुन्हे देखील दाखल आहेत त्याला पुणे जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आले होते. त्याच्यावरती आता आर्म ऍक्ट अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

गुन्हे शाखेचे पोलीस उपआयुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार गुन्हे शाखा युनिट-४ चे पथक अवैद्ध शस्त्र बाळगणाऱ्यांबाबत माहिती काढत असताना त्यांना माहिती मिळाली की, रेकॉर्ड वरील तडीपार आरोपी पवन बनेटी हा पिंपळे निलख परिसरात येणार असून त्याच्याकडे पिस्तुल आहे. त्यानंतर पथकाने पवन देवेंद्र बनेटी याला शिताफीने ताब्यात घेवून त्यांच्याकडुन दोन पिस्तुल आणि ०२ जिवंत काडतुसे जप्त केली.

पवन देवेंद्र बनेटी हा मोक्का जेल रिलिज व रेकॉर्डवरील आरोपी असून त्याच्या विरुद्ध दोन गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. त्याला पुणे जिल्ह्यातुन दोन वर्षाकरिता तडीपार करण्यात आले आहे. त्याच्याविरुद्ध सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदरची कारवाई पिंपरी चिंचवड पोलिस गुन्हे शाखा युनिट ४ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार, पोलीस उपनिरीक्षक भरत गोसावी, मयुरेश साळुंखे, सहायक पोलीस उपनिरीक्षक संजय गवारे, प्रविण दळे, नितीन ढोरजे, पोलीस हवालदार कृणाल शिंदे, सुरेश जायनाये, तुषार शेटे, मोहम्मद गौस नदाफ, भाऊसाहेब राठोड, पोलीस शिपाई प्रशांत सैद, गोविंद चव्हाण, सुखदेव गावंडे, अमर राणे, दिनकर आडे, रवि पवार, धनंजय जाधव यांनी केली आहे.





















Join Our Whatsapp Group