पिंपरी (Pclive7.com):- मोहननगर येथील श्री साईनाथ तरुण मंडळाचे यंदा ५० वे वर्ष आहे. त्यामुळे यावर्षीचा गणेशोत्सव मंडळाने समाजोत्सव म्हणून साजरा केला आहे. श्रीं ची आरती अनाथ मुलांच्या हस्ते केली. तसेच काळेवाडीतील स्पंदन बाल आश्रमातील विद्यार्थ्यांना अन्नधान्य, शिधा देत मंडळाने मदतीचा हात दिला आहे.

श्री साईनाथ तरुण मंडळ वर्षभर विविध सामाजिक तसेच समाज उपयोगी उपक्रम राबवत असते. यंदाच्या वर्षी मंडळाचे ५० वे वर्ष आहे. त्यामुळेच यंदाचा गणेशोत्सव हा समाजोत्सव म्हणून मंडळाने साजरा केला आहे.

मंडळाने काल श्रीं ची आरती अनाथ मूलांच्या हस्ते करण्यात आली. काळेवाडीतील स्पंदन बाल आश्रमच्या विद्यार्थ्यांना दिलीप सोनीगरा ज्वेलर्सचे प्रोप्रायटर दिलीप सोनीगरा व प्रीतम संघवी यांच्या हस्ते अन्न धान्य व शिधा देण्यात आली.

यावेळी मंडळाचे अध्यक्ष गणेश लंगोटे, स्पंदन बाल आश्रम संस्थेचे गणेश म्हस्के, यशवंत नामदे व मंडळाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

दरम्यान मंडळाच्या वतीने रविवार दिनांक ३१ ऑगस्ट रोजी मोफत आरोग्य व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोहननगर परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.






















Join Our Whatsapp Group