
पिंपरी (Pclive7.com):- छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल बालेवाडी येथे महाराष्ट्र राज्य ज्युनिअर ॲथलेटिक्स स्पर्धा पार पडली. ३९ व्या राज्यस्तरीय स्पर्धेत पुणे जिल्ह्याच्या समृद्धी भोईर हिने हप्पटेथलॉन या क्रीडा प्रकारात सुवर्णपदक पटकावले. तर मधुरा खांबे हिने लॉंग जंप व ट्रिपल जंप या क्रीडा प्रकारात कास्य पदक जिंकले.

या दोघी खेळाडू चंद्रशेखर कुदळे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे. संत तुकाराम क्रीडा संकुल इंद्रायणी नगर भोसरी येथे ते नियमित सराव करत आहेत. चंद्रशेखर कुदळे यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक राष्ट्रीय खेळाडू घडवले गेले आहेत. बाहेरच्या जिल्ह्यातील खेळाडू देखील चंद्रशेखर कुदळे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत असून त्यांनाही त्यांच्या जिल्ह्यात यश प्राप्त होत आहे.























Join Our Whatsapp Group