पिंपरी (Pclive7.com):- पिंपरीगाव येथील मित्र सहकार्य तरूण मंडळाचा बाप्पा नवसाचा महागणपती म्हणून ओळखला जातो. मंडळाचे यंदाचे हे ६१ वे वर्ष असून प्रथेनुसार या मंडळाची मिरवणूक पारंपारिक वाद्य ढोल ताशांच्या गजरात दुपारी सुरू झाली. भव्य दिव्य हनुमान रथ हा यंदाच्या मिरवणुकीचे प्रमुख आकर्षण होतं.

पिंपरीगाव येथील तपोवन रस्त्यावर या मंडळाचे गणेश मंदीर आहे. या मंडळाच्यावतीने वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. मित्र सहकार्य तरूण मंडळाच्या नवसाच्या महागणपतीची मिरवणूक ही मानाची मानली जाते.

पिंपरीत या मंडळाच्या मिरवणूकीने विसर्जनला सुरूवात होते. मंडळाने प्रथेनुसार यंदाच्या वर्षी देखील मिरवणूकीत डॉल्बी, डिजेला फाटा देत पारंपारिक पध्दतीच्या ढोल ताशांचा वापर केला आहे. ही मिरवणूक पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.























Join Our Whatsapp Group