पिंपरी (Pclive7.com):- “जनसामान्यांच्या हितासाठी सतत झटणारे नगरसेवक सचिन चिखले हे खरे नेतृत्व आहे. अशा नेतृत्वाच्या पाठीशी आपण ठामपणे उभे राहायला हवे,” असे गौरवोद्गार सुप्रसिद्ध अभिनेते अशोक शिंदे यांनी काढले. ते निगडी प्रभागातील सेक्टर २२ येथील गणपती मंडळाच्या आरती प्रसंगी बोलत होते.

या प्रसंगी उद्योजक रमेश शेट्टी यांनी अभिनेते अशोक शिंदे व नगरसेवक सचिन चिखले यांना श्री गणरायाच्या आरतीसाठी विशेष निमंत्रित केले होते. आरतीनंतर आपल्या भावना व्यक्त करताना अशोक शिंदे म्हणाले, “सचिन चिखले यांना मी अनेक वर्षांपासून ओळखतो. समाजकारणाची त्यांची धडपड, जनतेसाठी केलेले कार्य व लोकाभिमुख विचार हे कौतुकास्पद आहेत. त्यांच्यासारख्या नेतृत्वामुळे समाजाच्या प्रगतीला खऱ्या अर्थाने चालना मिळते.”

या कार्यक्रमाला परिसरातील मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. गणेशोत्सवाच्या उत्साहात सचिन चिखले यांच्या कार्याची दखल घेतल्यामुळे वातावरण अधिक उत्साही व प्रेरणादायी झाले.























Join Our Whatsapp Group