पिंपरी (Pclive7.com):- सेंट्रींगचे काम करत असलेल्या एका व्यावसायिकाचे अपहरण करून जीवे मारण्याची धमकी देत २५ हजार रुपयांची खंडणी घेतल्याप्रकरणी एका तरुणाला हिंजवडी पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी आकाश सत्यवान तापकीर (वय २९ वर्षे, रा. तांजणेमळा, काळजेवाडी च-होली बुद्रुक ता. हवेली, जि.पुणे) याला पोलिसांनी अटक केली आहे.

लालबाबुकुमार रामइक्बाल प्रसाद (वय २८ वर्षे व्यवसाय द्व सेंट्रींग काम, रा. राकेश पवार यांचे घरी भाडयाने, शिंदेवस्ती मारुंजी ता. मुळशी जि. पुणे) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलिसात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी लालबाबुकुमार प्रसाद हे त्यांचे काम संपवुन घरी जात असताना आरोपी आकाश तापकीर याने मारूंजी येथे त्यांना रस्त्यात आडवले. त्यानंतर लालबाबुकुमार प्रसाद यांच्या गळ्याला चाकु लावुन जबरदस्तीने नेक्सॉन गाडीमध्ये बसवुन त्यांचे अपहरण करत जीवे ठार मारण्याची धमकी देवुन जबरदस्तीने २५ हजार रुपयांची खंडणी घेतली. हा सर्व प्रकार दि.०५ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री ७:४५ ते १० वाजण्याच्या दरम्यान मारुंजी ता. मुळशी जि. पुणे येथे घडला.

याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी आरोपी आकाश तापकीर याला अटक केली असून सहायक पोलिस निरीक्षक वांगणेकर हे पुढील तपास करीत आहेत.






















Join Our Whatsapp Group