पिंपरी (Pclive7.com):- विजयनगर काळेवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते विजय सुतार यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला.

विजय सुतार यांच्या वाढदिवसानिमित्त विजयनगर येथील जिजाऊ क्लिनिक येथे वृक्षारोपण कार्यक्रम, स्नेह छाया प्रकल्प दिघी येथील विद्यार्थ्यांना अन्नदान सामुग्री देऊन व नगद नारायण वारकरी संस्था आळंदी येथील वारकरी मुलांना अन्नदान सामग्री व रात्री काळेवाडी प्रभागातील महिलांसाठी खेळ पैठणीचा या कार्यक्रमाने वाढदिवस साजरा केला.

कुठलीही बॅनरबाजी न करता सामाजिक उपक्रमाने वाढदिवस साजरा करण्याचा विजय सुतार मित्रपरिवाराने निर्णय घेऊन स्तुत्य उपक्रम राबवल्याने काळेवाडी परिसरातील नागरिकांनी शुभेच्छाचा व कौतुकाचा वर्षाव होत आहे.

काळेवाडी परिसरातील नागरिकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी विजय सुतार हे नेहमी अग्रेसर भूमिका घेतात, नागरिकांचे प्रश्न शासन दरबारी मांडत असतात. ड्रेनेज लाईन, लाईट, रस्ते अशा विविध समस्या विजय सुतार सोडवण्यासाठी त्यांचा कायम पुढाकार असतो. विजय सुतार यांच्या अभिष्टचिंतनानिमित्त काळेवाडी परिसरातील मोठ्या संख्येने सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी तसेच ज्येष्ठ नागरिक आणि महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.





















Join Our Whatsapp Group