पिंपरी (Pclive7.com):- चिखली परिसरातील अंगणवाडी रस्ता व चिंचेचा मळा ते वागुसाने चौक या रस्त्याचे तातडीने नूतनीकरण आणि डांबरीकरण करा अशा मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते यश दत्ताकाका साने यांनी केले आहे.

यश साने यांनी यासंदर्भात महापालिकेच्या फ क्षेत्रीय कार्यालयाचे मुख्य अभियंता यांना निवेदन दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, अंगणवाडी रोड व चिंचेचा मळा ते वाघू साने चौक रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत.

हा रस्ता जागोजागी खराब झाल्यामुळे दुचाकीवरून जाणाऱ्या नागरिकांचे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. लोकांचा येण्या-जाण्याचा प्रमुख रस्ता असल्यामुळे अत्यावश्यक म्हणून या रस्त्याचे तातडीने डांबरीकरण करण्यात यावे अशी मागणी यश साने यांनी केली आहे.






















Join Our Whatsapp Group