पिंपरी (Pclive7.com):- सांगवी परिसरातील नागरिकांच्या कोणत्याही समस्या आता फक्त एका कॉलवर सोडविल्या जाणार आहेत. स्थायी समितीचे माजी सभापती, माजी नगरसेवक प्रशांत शितोळे यांनी सांगवी वासियांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह 24×7 हेल्पलाइन सेवा सुरू केली आहे.

सांगवी परिसरातील नागरिकांच्या कोणत्याही मूलभूत समस्या आता एक कॉलवर सॉल्व्ह होणार आहे. 8308591818 या हेल्पलाईन क्रमांकावर नागरिकांनी संपर्क साधल्यास त्यांची समस्या तात्काळ सोडवण्यात येईल असे आश्वासन प्रशांत शितोळे यांनी दिले आहे. सांगवी परिसरातील नागरिकांनी 8308591818 या हेल्पलाईन क्रमांकावर व्हॉट्सॲप किंवा कॉल करून त्यांची अडचण कळवावी, तात्काळ त्यांची समस्या सोडविली जाणार आहे.

पाण्याची समस्या, ड्रेनेजची समस्या तसेच रस्त्यावर असलेल्या खड्ड्यांची समस्या तात्काळ या हेल्पलाईनच्या माध्यमातून सोडविण्यात येणार आहेत. नागरिकांच्या सेवेशी आम्ही सदैव तत्पर आहोत.– प्रशांत शितोळे, माजी नगरसेवक























Join Our Whatsapp Group