पिंपरी (Pclive7.com):-पिंपळे गुरव, दापोडी येथे पारंपारिक पध्दतीने बैलपोळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. बैलांची सजावट करून बैलांची मिरवणूक काढण्यात आली. पारंपारिक वाद्ये व फटाक्यांची आतिषबाजी करून मोठ्या उत्साहात मिरवणूकीची सुरुवात करण्यात आली.

पिंपळे गुरवचे ग्रामदैवत भैरवनाथ महाराज मंदिरा पासुन मिरवणूक काढण्यात आली. यावेळी मिरवणूकीत पिंपळे गुरव मधील गावकरी जगताप, काटे, पाटील, देवकर, पाटील आदी गावकरी यांनी आपल्या बैलजोडीनी सहभाग घेतला होता. बँड, ढोल, ताशा पथक यावर सर्व गावकरी एकत्र येऊन मोठ्या प्रमाणात बैलपोळा साजरा करण्यात आला.

विलास तात्या जगताप प्रगतशील शेतकरी यांच्या मातोश्री झामाबाई काळुराम जगताप या सहकुटुंब यात तीन मुले, तीन सुना, सात नातवंडे, दोन मुली एक नातसून, तीन नाती, सहा परतुंडे असं एकत्रित कुटुंब साठ वर्षापासून बैल जोडीची मिरवणूक काढून बैल पोळा साजरा करण्यात आला. सध्या आधुनिकीकरणामुळे आणि स्मार्ट सिटी झाल्याने घराचे दर गगनाला भिडलेले आहेत. नागरिकांना गाडी लावण्यासाठी जागा शिल्लक राहीलेली नाही तरीही आम्ही जनावरे पाळुन शेती व दुधाचा रतीब नागरिकांना देऊन आम्ही आज चौथी पिढीने आजही परंपरा चालु ठेवलेली आहे. चौथ्या पिढीमध्ये इंजिनियर डॉक्टर पदवीधर असूनही शेती व जनावरांची सेवा करणे चालू ठेवले आहे.

नातवंडे व परतुंडे हि एरवी बैलांच्या पाठीवर बसुन खेळतात, सर्जाराजा लहान मुलांना कुठलीही इजा करत नाही. सर्व कुटुंबातील सदस्य सर्जा राजाची वर्षभर काळजी घेतात आणि बैलपोळ्याची आम्ही आतुरतेने वाट बघत असतो. पैलवान ग्रुपचे सदस्य निखिल जगताप व मित्रपरिवार यांनी तसेच सर्व पिंपळे गुरव दापोडी येथील गावकऱ्यांनी आपापल्या बैलजोडींची मिरवणुकीत सहभाग नोंदवला.
दापोडी येथील ओंकार गुंजाळ यांनी शिवशंभो म्युझिक सिस्टीमच्या तालावर दापोडीतील तरुण वर्ग म्युझिक सिस्टिमच्या तालावरती नाचून बैलपोळा साजरा करण्यात आला.






















Join Our Whatsapp Group