
पिंपरी (Pclive7.com):- श्री महालक्ष्मी मरीआई माता मंदिर, पिंपरीगाव येथे यंदाच्या शारदीय नवरात्र उत्सव २०२५ निमित्ताने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले असल्याची माहिती माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी दिली आहे.

या उपक्रमाचे आयोजन नगरसेवक संदीप बाळकृष्ण वाघेरे यांच्या मार्गदर्शनाखाली होत असून, महिला भजन मंडळे, धार्मिक कीर्तन, जागरण गोंधळ तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

२१/०९/२०२५ रोजी गजानन महाराज महिला भजन मंडळ
२२/०९/२०२५ रोजी माऊली महिला भजन मंडळ
२३/०९/२०२५ रोजी जेष्ठ नागरिक साईराम महिला भजन मंडळ
२४/०९/२०२५ रोजी दत्तगुरु महिला भजन मंडळ
२५/०९/२०२५ रोजी जय भवानी महिला भजन मंडळ
२६/०९/२०२५ रोजी जाणुबाई महिला भजन मंडळ
२७/०९/२०२५ रोजी सावित्रीबाई महिला भजन मंडळ
२८/०९/२०२५ रोजी विठ्ठल रुख्मिणी महिला भजन मंडळ
२९/०९/२०२५ रोजी जागरण गोंधळ
३०/०९/२०२५ रोजी दसरा व कोजागिरी पौर्णिमा महिला जागरण
०१/१०/२०२५ रोजी नवरात्र निमित्त नवचंडी यज्ञ दुपारी ४ ते ७ वाजता व महाप्रसाद सायं ७ ते १० या वेळेत आयोजित आहे.

या उत्सवाबाबत नगरसेवक संदीप वाघेरे म्हणाले, “पिंपरीगावातील नागरिकांचे श्रद्धास्थान असलेल्या मरीआई मातेसमोर नवरात्रोत्सवाचे धार्मिक वातावरण निर्माण करून समाजातील महिलांना, भजन मंडळांना आणि नागरिकांना एकत्र आणणे हा उत्सवाचा हेतू आहे.”

यावेळी पिंपरीगाव परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन संदीप वाघेरे यांच्या वतीने करण्यात आले आहे.






















Join Our Whatsapp Group