
पिंपरी (Pclive7.com):- चिंचवड येथील नागसेननगर झोपडपट्टीमध्ये आज (दि.२२) दुपारी साडेतीनच्या सुमारास एका २५ वर्षीय तरुणाची जुन्या भांडणाच्या रागातून हत्या करण्यात आली आहे. वैभव भागवत थोरात असे २५ वर्षीय मयत तरुणाचे नाव आहे.

या प्रकरणी पिंपरी चिंचवड पोलिसांनी चार आरोपींना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत वैभव थोरात हा त्याच्या खोलीत इतर ४ जणांसोबत बसला होता. त्याचवेळी अचानक आरोपी योगेश अनंत गायकवाड, अनिल आनंद बनसोडे, महेश अप्पालाल कोळी आणि एक अल्पवयीन मुलगा तिथे आले. योगेश आणि वैभव यांच्यात पूर्वीपासून वाद सुरू होता. याच जुन्या वादातून या आरोपींनी वैभववर कोयत्याने हल्ला केला.

या हल्ल्यात वैभवच्या हातावर, छातीवर आणि डोक्यावर गंभीर वार करण्यात आले, ज्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत चारही आरोपींना ताब्यात घेतले आहे. पुढील तपास चिंचवड पोलीस करत आहेत.
























Join Our Whatsapp Group