
पिंपरी (Pclive7.com):- श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे मानाची बैलजोडी लक्ष्या आणि हिरा यांची बैलपोळा निमित्त शाही मिरवणूक काढण्यात आली. वाकड येथील स्वीकृत नगरसेवक गिरीश शेडगे व प्रगतशील शेतकरी ज्ञानेश्वरी शेडगे यांचीही बैल जोडी आहे.

बैलपोळा निमित्त लक्ष्या आणि हिरा यांची शाही मिरवणुकी वाकड परिसरात काढण्यात आली. या मिरवणुकीत वडगाव धायरी येथील अमर ब्रास ब्रँड हे प्रमुख आकर्षण म्हणून बोलावण्यात आलेले होते. पुणे जिल्ह्यातील व वाकड गावातील मानाची प्रथम बैल जोडी यांचा शाही बैलपोळा वाकड गाव शेडगे वस्ती येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी कर्नाटक मधील बैलाचे प्रसिद्ध व्यापारी संतोष कब्बुरे, खिल्लार महाराष्ट्राची शान यूट्यूब चॅनलचे प्रमुख सूरज दिघे, उद्योजक सागर नाणेकर, हभप सीताराम मातेरे, सचिन परांडे, नवनाथ येळवंडे, वाकड ग्रामस्थ व मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता. कार्यक्रमाचे संयोजन जय भवानी मित्र मंडळाने केले होते.
























Join Our Whatsapp Group