
पिंपरी (Pclive7.com):- काळेवाडी येथे एमएम कॉलेजजवळ एका भरधाव सिमेंट मिक्सर ट्रकने मोपेडला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात मोपेडवरील महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचे पती गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना सोमवारी (दि.२२) रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली.

राजेश्वरी चंद्रशेखरन अय्यर (वय ६५) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणात चंद्रशेखरन नारायणस्वामी अय्यर (वय ७३, वैभवनगर, पिंपरी) यांनी काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. डंपर चालक अरविंद मनोहर नागरे (२७, मोई, खेड) याला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांच्या पत्नी राजेश्वरी हे काळेवाडी येथून खरेदी करून त्यांच्या मोपेड (एमएच १४ जीटी ८४२३) वरून घरी जात होते. त्यावेळी पाठीमागून आलेल्या सिमेंट मिक्सर ट्रकने (एमएच १४/एमएच ९०२४) त्यांच्या गाडीला जोरदार धडक दिली. यात राजेश्वरी यांचा पत्नीचा मृत्यू झाला आणि ते स्वतः गंभीर जखमी झाले. काळेवाडी पोलीस तपास करत आहेत.


























Join Our Whatsapp Group