
पिंपरी (Pclive7.com):- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अल्पसंख्याक विभागाच्या सचिवपदी अक्रम शेख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती अखिल भारतीय काँग्रेस कमिटी (एआयसीसी) च्या अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष खासदार इम्रान प्रतापगढी यांच्या मान्यतेने करण्यात आली आहे.

अक्रम शेख हे पिंपरी-चिंचवड शहरातील सक्रिय समाजसेवक असून, पत्रकार म्हणूनही त्यांचा विशेष ओळख आहे. ते व्हीएसआरएस न्यूज या माध्यम संस्थेमार्फत पत्रकारिता करत आहेत. सामाजिक प्रश्नांवर अभ्यासपूर्ण भूमिका मांडणाऱ्या शेख यांनी अनेक वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रमांतून आपली छाप सोडली आहे.

विशेष म्हणजे, अक्रम शेख हे काँग्रेस पक्षाचे नेते व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे निकटवर्ती समजले जातात. पक्षातील त्यांची निष्ठा आणि कार्यक्षमतेची दखल घेत त्यांना सचिवपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

या नियुक्तीसाठी मो. अहमद खान, उपाध्यक्ष आणि प्रभारी — अल्पसंख्याक विभाग (मुंबई व महाराष्ट्र), यांनी अधिकृत मान्यता दिली असून, काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसाठी आणि अल्पसंख्याक समाजातील संवाद वृद्धिंगत करण्यासाठी ही नियुक्ती महत्वाची ठरणार आहे. पक्षाकडून अक्रम शेख यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.



























Join Our Whatsapp Group