
पिंपरी (Pclive7.com):- व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ॲप्सद्वारे अज्ञात व्यक्तींनी टास्क देऊन एका तरूणीची ७ लाख ६८ हजार ३२ रुपयांची आर्थिक फसवणूक केली. ही घटना ११ सप्टेंबर ते २० सप्टेंबर या कालावधीत पिंपरी येथे घडली.

याप्रकरणी २८ वर्षीय तरुणीने संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादीला व्हॉट्सॲपवर एक लिंक पाठवून त्यांना टेलिग्राम ॲपवर जॉईन होण्यास सांगितले. टेलिग्राम ग्रुपमध्ये जॉईन झाल्यानंतर लिव्हिना नाव सांगणाऱ्या अनोळखी महिलेने फिर्यादीला वेगवेगळे टास्क दिले.

या टास्कसाठी फिर्यादीला विविध बँक खात्यांवर आणि क्यूआर कोडवर पैसे भरण्यास सांगून त्यांची फसवणूक केली. संत तुकाराम नगर पोलीस तपास करत आहेत.


























Join Our Whatsapp Group