

पिंपरी (Pclive7.com):- देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा ‘मन की बात’ कार्यक्रमाचा १२६ वा भाग पिंपरी येथील ‘भाजपा मध्यवर्ती कार्यालय’ येथे आयोजित करण्यात आला होता. भाजपा युवा मोर्चाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

तसेच या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांकडून भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या सूचनेनुसार ‘हर घर स्वदेशी, घर घर स्वदेशी’ संकल्प पत्र भरून घेतले.

याप्रसंगी भाजपा भाजपा पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष शत्रुघ्न काटे, मन की बात पश्चिम महाराष्ट्र संयोजक तथा विधानपरिषद आमदार अमित गोरखे, दक्षिण भारतीय आघाडी महाराष्ट्र प्रदेश संयोजक राजेश पिल्ले, जिल्हा सरचिटणीस मधुकर बच्चे, युवा मोर्चा प्रदेश सचिव अजित कुलथे, ओबीसी मोर्चा प्रदेश सरचिटणीस मनोज ब्राह्मणकर, भाजयुमो शहर अध्यक्ष दिनेश यादव, जिल्हा कोषाध्यक्ष राजाभाऊ मासुळकर, मन की बात पिंपरी चिंचवड शहर संयोजक नंदकुमार दाभाडे यांच्या सह भाजयुमो प्रमुख पदाधिकारी उपस्थितीत होते.


























Join Our Whatsapp Group