

दिनेश यादव यांच्या पाठपुराव्याला यश
चिखली (Pclive7.com):- चिखली येथील मोरे पाटील चौक परिसरातील नागरिकांना गेल्या अनेक वर्षांपासून भेडसावत असलेल्या ड्रेनेज समस्येवर अखेर कायमस्वरूपी तोडगा निघाला आहे. भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष दिनेश यादव यांच्या सातत्यपूर्ण व यशस्वी पाठपुराव्यामुळे नवीन ड्रेनेज लाईन टाकण्याच्या कामाचा शुभारंभ आज झाला.

या भागात सतत पाणी साचणे, दुर्गंधी, रस्त्यावरील अडथळे यामुळे नागरिक त्रस्त झाले होते. या समस्येवर तातडीने उपाययोजना करण्यासाठी यादव यांनी महापालिका प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केला होता. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

स्थानिक नागरिकांनी सांगितले की, “दिनेश यादव यांच्या प्रयत्नांमुळे अखेर आमची जुनी समस्या सुटली आहे. परिसर आता स्वच्छ व आरोग्यदायी होईल.” नवीन ड्रेनेज लाईन बसविल्यानंतर मोरे पाटील चौकाचा सर्वांगीण विकास होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

यावेळी चेअरमन दत्तात्रय मोरे, ह भ प रमेश मोरे, अँड नितीन मोरे, उद्योजक मनोज मोरे यांच्यासह अनेक मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते.























Join Our Whatsapp Group